स्वभाव-विभाव

जेव्हा एखाद्या पुस्तकाचं नाव आपण वाचतो तेव्हा त्या पुस्तकात काय असेल याबद्दल बऱ्याच कल्पना वाचण्यापूर्वीच करून ठेवतो तसाच काहीसा अनुभव हे पुस्तक वाचताना आला नाव ‘स्वभाव-विभाव’ आणि लेखक एक मनोविकासतज्ञ मग हे पुस्तक नक्कीच विचार कसे Control करायचे यावरच असावं हा ग्रह झाला.

पण जस-जस वाचत गेलो हे पुस्तक फक्त विचार आणि ते हाताळण्याचा पद्धती यांच्या खूप पलीकडे आहे हे जाणवू लागलं, प्रत्येक भाग नवीन भावना, स्वभाव आणि विचार यांना हात घालत होता आणि माझ्याच आयुष्यात आलेले अनुभव मी घेतलेले निर्णय आणि त्यावेळची मानसिकता यावर पुन्हा विचार करायला लावत होता. बालपणापासून आत्तापर्यंत चा प्रवास, आयुष्यात भेटलेली प्रत्येक व्यक्ती त्यांची मानसिकता, मनात असलेले कितीतरी प्रश्न आणि एक नवीन दृष्टीकोन घेऊन या पुस्तकातून बाहेर आल्याचा अनुभव होतोय यात शंका नाही, एखाद्या गोष्टीकडे, व्यक्तीकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन हे पुस्तक नक्कीच देत.

आपल्या विचारांची शक्ती किती आहे ती कुठे केंद्रित करता येईल, आपण कसे सतत शिकत असतो आणि शिकत राहणार,मनाची चंचलता,सुख दुःखांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, Overthinking म्हणजे नक्की काय, भीती आणि मानसिकता, चूकxपच्छताप, भावनाxप्रतिक्रिया, अपेक्ष्या असे कितीतरी मुद्दे अगदी उदाहरणासाहित इतक्या सुंदरपणे मांडले आहेत की तुम्ही स्वतःला त्यात बघू लागाल हे नक्की, विचारांना धरून ठेवता आलं नाही तरी त्यांना दिशा मात्र नक्कीच देत येते मग कधी हो म्हणायचं आणि कधी नाही हे आपण ठरवतो, स्वार्थ नकारात्मक नसतो तो प्रत्येकात असतोच भौतिक किंवा मानसिक स्वरूपात आपण तो अनुभवतो अट्टाहास आणि अपेक्षा यातला फरक कळला की आपली भूमिका स्पष्ट होते,यश-अपयश हे याच अपेक्ष्यांची देण असते, Excellence is my mission पण Excellence चा अट्टाहास हवा की त्या प्रक्रियेतला आनंद याच सुंदर उत्तर तुम्हाला इथे मिळेल. आपले यश मोजव की जगावं हे कळेल ? जवळजवळ आपल्या आयुष्यातील प्रत्येक भावना, विचार आणि दृष्टिकोन हा प्रवास म्हणजेच स्वभाव-विभाव. लेखक डॉ.आनंद नाडकर्णी यांनी खूप सुंदर मांडला आहे.

Swabhav-Vibhav

2 thoughts on “स्वभाव-विभाव

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started