अटोमिक हॅबिट्स -जेम्स क्लिअर

बरीच पुस्तक वाचली ज्यामध्ये गोल्स कसे सेट करता येतील, गोल्स ठरवताना कोणती काळजी घ्यावी हे सविस्तर वाचायला मिळालं पण या पुस्तकात फक्त गोल्स नाहीत तर त्यापर्यंत जाण्याचा मार्ग आणि आपल्या सवयी यांची चांगलीच सांगड घातली आहे म्हणून यावर थोडंस लिहितोय.

आपण बरेच मोटीवेशनल व्हिडीओ बघतो आणि उत्तेजित होऊन काहीतरी नवीन चालू करतो पण ते किती दिवस टिकत जास्तीत जास्त आठवडा आणि नंतर एक रविवार गेला की सर्व पूर्वपदावर पुन्हा एकदा जुन्या सवई,मग अजून एक व्हिडिओ हा क्रम काही संपत नाही,पण अश्याने सवई बदलतात का ? सवई का सुटत नाहीत ?

सवई काही आपणच लागत नाही आपणच त्या बनवत जातो मग आपण त्या बदलू पण शकतो त्याचे खूप मार्ग या पुस्तकात तुम्हाला मिळतील तेही उदाहरण आणि रिसर्च सहित, आपल्या प्रत्येक लहान कृतीतुन कश्या आपल्या सवई बनतात आणि या कृती बदलल्या की सवई कश्या बदलतात हे खूप छान शब्दात लेखकाने मांडलं आहे.

वर्षांची सवय एका दिवसात सुटेल का की एक दिवसात मी १००% प्रगती करेन ? या साठी या पुस्तकात १% Improvement चा खूप छान फॉर्म्युला सांगितला आहे एका दिवसात फक्त १% Improvement वर आपण लक्ष केंद्रित केल तर १०० दिवसात १००% आणि एका वर्षात ३६५% Improvement कशी करता येईल हे कळेल. गोल्स पेक्षाही त्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग महत्वाचा असतो,छोटे छोटे बदल,निर्णय आणि प्रयत्न या तुमच्या पायऱ्या असतात जर तुम्ही पहिल्या पायरीवर पाय न ठेवता जाल तर अडखळलाच ना?तसच प्रत्येक पायरी खूप महत्त्वाची असते आणि गोल्स पर्यंत जाण्याच्या या सिस्टम चा लेखक विस्तृत माहिती देतो.

आपण मुळात खूप आळशी असतो हाताच्या बाजूला जे मिळेल ते आपण करतो जसा मोबाइल चार्जिंग ला असेल तर उठून तो बघणं नकोस वाटत तर पुस्तक कपाटात असेल तर ते नेहमी तिथेच राहत, एकंदर आपल्या सवई आपल्या परिसरावर ठरतात पुस्तक समोर असेल तर ते वाचावस वाटतं असेच छोटे छोटे बदल खूप महत्वाचे ठरतात. चांगल्या सवयींनसाठी आणि वाईट सवयी बदलण्यासाठी फक्त मोटीवेशन नाही तर आपल्या छोट्या छोट्या गोष्टी, परिसर यात बदल करावा लागतो आणि हेच छोटे बदल आपल्याला मोठी स्वप्न आणि आपलं ध्येयं यांची सतत आठवण करून देतात आणि मार्ग चुकू देत नाहीत. स्वप्न बघा पण त्यापर्यंत जाण्याचा मार्गही ठरवा…

असं हे Atomic Habit’s by @JamesClear नक्की वाचा आणि ध्येयपूर्तीसाठी मार्ग स्वतःच तयार करा.

Image

2 thoughts on “अटोमिक हॅबिट्स -जेम्स क्लिअर

    1. नमस्कार राजेश
      हे पुस्तक मराठी मध्ये उपलब्ध नाही पण ‘द पावर ऑफ हॅबिट्स’ हे पुस्तक सवई आणि त्यामधील बदल यांवर याचं मुद्द्यांवर भाष्य करतं.

      https://amzn.to/35sC7L5

      Like

Leave a reply to atarangi_kp Cancel reply

Design a site like this with WordPress.com
Get started