रिच डॅड पुअर डॅड

हे पुस्तक जवळ जवळ वर्षभरापूर्वी वाचलं पण अजूनही यात दिलेल्या बऱ्याच गोष्टी खऱ्या आयुष्यात किती महत्वाच्या आहेत हे प्रखरतेने जाणवत,जगण्यासाठी महत्वाचा पैसा,हा पैसा कसा मिळवायचा आणि कसा वाढवायचा याचे काही व्यावहारिक मुद्दे या पुस्तकात नक्कीच मिळतील

या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी या पुस्तकात त्यांच्या दोन वडीलांबद्दल सांगितले एक मध्यमवर्गीय त्यांचे स्वतःचे वडील आणि दुसरे श्रीमंत त्यांच्या मित्राचे वडील, लहानपणापासून या दोन्ही वडिलांकडून त्यांना मिळत गेलेली शिकवण त्यांनी खूप उत्तम रित्या मांडली आहे. शिक्षण झालं की आपण एका शर्यतीत स्वतःला झोकून देतो ती म्हणजे नोकरी-पैसा कारण काय तर सर्व तेच करतात, आपण पण हेच शिकलोय. तसंच काहीसं लेखकाच्या पहिल्या वडिलांचं मत होतं ते खूप हुशार आणि मेहनती सुद्धा. नोकरी करून आणि पैसा जमा करण हे त्यांच्या मनात ठाम होतं पण ते गरीबच राहिले ?

याविरुद्ध लेखकाचे दुसरे वडील होते ते सुद्धा खूप मेहनती पण ते वेगवेगळ्या कल्पनांवर काम करत, त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि पैसा वापरून पैसा कसा मिळवता येईल यावर बऱ्याच गोष्टी ते करत गेले आणि रॉबर्टलाही शिकवत गेले. असे हे दोन्ही वडील मेहनती पण वेगळ्या विचारांवर चालत होते. आता या मधला योग्य मार्ग कोणता आणि तो कसा निवडायचा ? यावर बोलणार हे पुस्तक यामध्ये बरेच अशी उदाहरण आणि मुद्दे खूप चांगल्या प्रकारे मांडले गेले आहेत. प्रवास सुरु करताना आपल्याला कुठून कुठे जायच आहे हे आपण ठरवतो तसच आधी आपण नक्की कुठे आहोत हे कसं ओळखायचं हे तुम्हाला इथे स्वतःची ओळख पटली आणि खात्री झाली की आत्ता आपण कुठे आहोत आणि कुठे जायचंय मग आपण तिथपर्यंत पोहोचण्याचा रस्ता शोधतो किंवा ठरवतो. पैश्यापेक्षाही मौल्यवान असतात ते आपण शिकत असलेल्या प्रत्येक गोष्टी त्यांचा पैसा मिळवण्यासाठी कसा उपयोग करायचा हे मुद्देसूद या पुस्तकात मिळेल.

असं हे रिच डॅड पुअर डॅड एका कथेसोबतच तुम्हाला एक दिशा देऊन जातं त्यामुळे नक्की वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा.

Image

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started