स्वतः IIM-A ची विद्यार्थिनी असलेल्या रश्मी बन्सल यांनी IIM-A मधल्या Center for Innovation Incubation and Entrepreneurship (CIIE)सोबत लिहिलेल्या “Stay Hungry Stay Foolish” या पुस्तकाचा विदुला टोकेकर यांनी केलेला मराठी अनुवाद उद्योगस्वप्न उरात असणाऱ्या सर्व युवकांनी अवश्य वाचावा.
IIM अहमदाबादच्या २५ माजी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने असंख्य अडचणींवर मात करत आपला ठसा कसा उठवला याची गाथा सांगणारे हे पुस्तक. Believers, Opportunist आणि Alternate Vision असणारे अशा तीन प्रकारात या २५ Hungry आणि Foolish उद्योजकांची विभागणी केली आहे. Believers प्रकारात निश्चित ध्येय असलेले, उद्योजकच बनायचे या विचाराने प्रेरित होऊन व्यवसायात उडी घेणारे विद्यार्थी आहेत. त्यात naukari.com चे संजीव बिखचंदानी,एकलव्य फाऊंडेशनचे सुनील हांडा, रेणुका शुगर्सचे नरेंद्र मुरकुंबी, सुभिक्षा रिटेलचे आर सुब्रमण्यम वगैरे आहेत.
दुसऱ्या प्रकारात संधीचे सोने करणारे Opportunist मोडतात. यात makemytripचे दीप कालरा, India Infoline चे निर्मल जैन, तसेच MPhasis, Orchid Pharma, EXL services सारख्या प्रसिद्ध कंपन्या स्थापणारे अनेक विद्यार्थी आहेत. तिसऱ्या प्रकारात Alternate Vision असणारे वेगळ्या वाटेचे वाटसरू आहेत.
प्रत्येक प्रकरणानंतर तरुण उद्योजकांना यशस्वी उद्योजकांनी मोलाचा सल्ला दिलेला आहे. स्वप्न पहा, ती पूर्ण करा, धडपडला तर पुनःपुन्हा उठून उभे राहण्याची जिद्द ठेवा हा संदेश देणारे हे पुस्तक अवश्य वाचा. अनुवाद नाही आवडला तर मूळ पुस्तक अवश्य वाचावे.
समीक्षा: पुस्तक प्रवाह Follow on twitter👇 https://twitter.com/PustakPravah?s=09
