नेहमी वाटत कि आपले मित्र बनावे आपला प्रभाव त्यांच्यावर पडावा आणि त्यांनीही आपल्या सोबत मिसळून जावं.पण बऱ्याच वेळा मत पटत नाही वाद होतात मुद्दे पटवण्याचा खटाटोप चालू होतो पण अश्या प्रकारे मित्र बनतात का ? प्रभाव पडतो का ? या पुस्तकामध्ये तुम्हाला हे जाणून घेता येईल ,जश्या आज्जीच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप विचार आणि शिकवण मिळते तसच बरेच छोटे छोटे अनुभव आणि मुद्दे लेखकाने खूप छान घटनांमधून आणि गोष्टींमधून मांडले आहेत,गोष्टीच तात्पर्य म्हणजेच मिळालेली शिकवण.
आपल्या दैनंदिन वर्तनातील बदल हेच आपल्या मित्र बनवण्याचे आणि प्रभाव पाडण्याचं मुख्य मूळ आहे,आपलं मत पटवण्यासाठी कधी कोणावर टीका न करणे, इतरांचे बोलणे पूर्ण ऐकून घेत मनापासून इतरांमध्ये रस ठेवणे,एखाद्याच नाव लक्ष्यात ठेवणं किती महत्वाचं आहे आणि काय वागणुकीत काय बदल घडतात हे कळेल.
या पुस्तकातील हे काही नियम;
१. आपल्यामध्ये इतरांकडून शिकण्याची आणि समजून घेण्याची ताकद आहे आणि तीच मित्र बनण्याच मूळ आहे
२. टीका करून,निंदा करून किंवा तक्रार करून माणसं जोडता येत नाही त्यामुळे ते टाळा
३. दिखाव्याची प्रशंसा आणि हो ला हो म्हणणं टाळा मनापासून प्रशंसा करा.
४. इतरांमध्ये मनापासून रस घ्या (Genuine interest ठेवा )
५. बोलताना नेहमी स्मित हास्य ठेवा
६. प्रत्येकाला स्वतःबद्दल बोलायला आनंद वाटतो त्यांना बोलू द्या, त्यांना त्यांच्याबद्दल विचारा
७. इतरांना महत्व द्या आणि ते प्रामाणिक पणे करा
८. आपली चुकी असेल तर त्वरित मान्य करा
९. जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलण्यात Comfortable होईल तेव्हाच संवाद वाढेल
१०. दुसर्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून गोष्टी पाहण्याचा खरा प्रयत्न करा
हे पुस्तक वाचताना सतत विचार करायला लावत कि आपण कुठे चुकतोय कोणते बदल केले पाहिजेत आणि का ? असे अजून बरेच मुद्दे या पुस्तकात आहेत, मी काही माझ्या शब्दांत थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला, नक्की वाचा आणि तुमच्या सुध्या प्रतिक्रिया नक्की लिहा.
