मनाचे चमत्कार – डॉ. जोसेफ मर्फी

आपण नक्की काय आहोत आणि आयुष्यात कोणत्या दिशेने वाटचाल करू हे आपलेच विचार ठरवतात आपली प्रत्येक गोष्ट आपलं आरोग्य, आपली संपत्ती, नाती हे सर्व काही आपण आपल्या सुप्त मनाशी किंवा अवचेतन मनाशी कसा संवाद घालतो यावर अवलंबून असत.

जोसेफ मर्फी यांचं ‘मनाचे चमत्कार’ (Miracle’s of your Mind) हे पुस्तक यावरच भाष्य करतं वाचनीय, लहान आणि सोप्प अस हे पुस्तक सुप्त मनाला जागृत करण्यासाठी काही पद्धती सांगत.
एकदा आपण आपल्या सुप्त मनाची शक्ती जाणण्यास सुरुवात केली आणि त्यावर विश्वास ठेवला की हीच शक्ती आपल्याला मार्ग दाखवते.

एक सोप्प आणि आपण सर्वांनीच अनुभवलेलं उदाहरण सांगायचं झालं तर काही वेळा काही प्रश्नांची उत्तरं कितीही शोधली तरी मिळत नाही काय करावं ते सुचत नाही पण अचानक सकाळी उठल्यावर किंवा आंघोळ, दाढी आणि अशी सहज काम करताना त्या प्रश्नाचं उत्तर मिळत खर तर आपण त्या प्रश्नाबद्दल तेव्हा विचारच करत नसतो मग अस का होतं ?

याच कारण असतं आपलं अंतर्मन ते सतत कार्यरत असत आणि आपल्याला मार्ग दाखवत असतं.
सतत कार्यरत असलेल्या या अंतर्मनाला तुम्ही स्वतः सूचना देऊन अशी काम करून घेऊ शकता

संमोहन शास्त्र आणि त्याचे प्रयोग तुम्ही बघितला असेल तर संमोहित व्यक्तीला कारलं सुद्धा गोड लागत आणि अगदी बारीक व्यक्तीच्या शरीरात अफाट शक्ती येते असं का होत असावा ?
कारण त्या अवस्थेत आपलं अंतर्मन बाह्यमानापेक्षा जास्त प्रखरतरने काम करत असत , त्याला संमोहन करणारा जी सूचना देईल तसं ते शरीराला वागवत असतं. समोहनाने बरेच मानसिक आणि शारीरिक आजार बरे होतात हे ऐकलंच असेल ती जादू सुद्धा आपल्या अंतर्मनाचीच.

अश्या या अफाट शक्ती असलेल्या आपल्या अंतर्मनाला कश्या प्रकारे हाताळता येईल. आपण त्याचा वापर आपली प्रगती साध्य करण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी, यश प्राप्ती साठी, हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी कसा करू शकतो याच उदाहरणासहित मार्गदर्शन तुम्हाला
या पुस्तकात नक्की मिळेल

नक्की वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया सांगा 🙏🙏🙏

2 thoughts on “मनाचे चमत्कार – डॉ. जोसेफ मर्फी

  1. उत्तम समिक्षा लिहीली आहे.
    लगेच पुस्तक हातात घेऊन वाचावस वाटतय.
    Thank you👍

    Liked by 1 person

Leave a reply to atarangi_kp Cancel reply

Design a site like this with WordPress.com
Get started