लमाण – श्रीराम लागू

नटसम्राट गणपतराव बेलवलकारांनसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे,विचार स्वातंत्र्याच्या चळवळी, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सार्वजनिक महत्वाच्या कामांत आघाडीवर राहणारे आणि सामाजिक कुतज्ञता निधीला नेतृत्वदेणारे डॉक्टर श्रीराम लागू आपल्या ‘नाटकी जीवनाला’ खणखणीत शब्दरूप देत आहेत.

-लमाण – डॉक्टर श्रीराम लागू

‘लमाण’ या पुस्तकाच्या नावातच लेखकाची या लेखनामागची भूमिका स्पष्ट होते. ‘आम्ही नट म्हणजे नुसते लमाण. इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे’ हे शिरवाडकरांचे वाक्य या पुस्तकाचा मुख्य गाभा ‘म्हणून पुस्तकाचे नाव ‘लमाण’

३५६ पानांचे हे आत्मचरित्र लागूंनी अगदी मोकळेपणाने लिहिले आहे यामध्ये त्याचं नाटकावर असणार प्रेम , मुख्य म्हणजे हे त्याचं आत्मचरित्र नव्हे, तर जी त्यांची नाट्यसंपदा , चित्रपट प्रवास या सर्व गोष्टींचा धावता आढावा आहे .

पुस्तकामध्ये नाटक व त्या सुमारास घडलेल्या घडामोडी तर लिहिल्या आहेतच पण त्या घटनेबाबत /व्यक्तीबद्दल सुद्धा आपली रोखठोक भूमिका स्पष्टपणे मांडली आहे फर्ग्युसनच्या स्नेहसंमेलन भ्रमाचा भोपळा या नाटकापासून सुरु झालेली त्यांची नाट्य घौडदौड ते २००३ मध्ये आलेलं मित्र नाटक इथपर्यंत चा त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे.

त्यातील ठळक आठवणी म्हणजे – “इथे ओशाळला मृत्यू , गिधाडे , काचेचा चंद्र , नटसम्राट, वेड्याचं घर, उन्हात ,एकच प्याला “. शेवटी त्यांच्या या प्रवासातील बंगालचे सुप्रसिद्ध रंगकर्मी शंभू मित्र यांच्या –An ideal actor should be an “athlete” as well as a “philosopher”. आणि “ARE THE INSTRUMENT YOU ARE THE PLAYER” ह्या ओळी मनात घर करून आहेत.

हे पुस्तक नक्की वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की लिहा.

समीक्षा – सत्यजित पाटील

Twitter: @Satyampatil3334

Buy (Lamaan) Book Online at Low Prices in India | (Lamaan) Reviews &  Ratings - Amazon.in

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started